महिलांचे या कारणामुळे होते फॅटी लिव्हर 

शरीरात साठणाऱ्या फॅटचं टेन्शन कमी होतं का? आता फॅटी लिव्हरचंही प्रमाण वाढलंय; पण हे नेमकं होतं कशाने? तर पुढील ७ पदार्थांनी!

अलीकडे महिलांमध्ये फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढले आहे. यकृताच्या आतल्या भागात चरबी जमा होऊन ते निकामी होऊ शकते. 

त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर लिव्हर खराब होऊन त्याला सूज येते आणि  आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. 

पुरुषांनाही हा त्रास होतो, पण हॉर्मोनल चेंजेस, दैनंदिन आहारशैली, तणाव किंवा आरोग्याच्या इतर तक्रारींमुळे महिलांना अधिक त्रास संभवतो. 

विषारी पदार्थ बाहेर काढणं, ऊर्जा साठवणं, प्रथिनं तयार करणं, रक्तप्रवाह सुरळीत करणं इ. कामं यकृत करतं. ते निकामी कशामुळे होतं ते पाहू. 

जंक फूड, ऑयली फूड, सोडा, साखर यांचा मारा आणि फायबर, हेल्दी फॅट्स यांची कमतरता हे मुख्य कारण असते. 

वाढलेलं वजन, पोटाभोवती असलेल्या चरबीच्या वळकट्या, तासनतास बैठं काम आणि व्यायामाचा अभाव यामुळेही यकृत बिघडतं. 

मोनोपॉज नंतर एक्स्ट्रोजनची उणीव पोटाभोवती चरबी वाढवते, त्याचबरोबर ज्यांचे इन्सुलिन कमी असते त्यांनाही हा त्रास होतो. 

टाईप २ डायबेटीस असणाऱ्या लोकांनाही यकृताचा त्रास होतो. 

तसेच धूम्रपान, मद्यपान करणारे लोक, व्यायाम न करणारे लोक फॅटी लिव्हरचे शिकार बनतात. 

कुटुंबात कोणाला फॅटी लिव्हरची हिस्ट्री असेल तर महिलांकडे अनुवंशिकतेने हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. 

सदर माहिती सामान्य गृहीतकांच्या आधारे दिली असून यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 

Click Here