स्त्री असो किंवा पुरुष.. स्वाभिमान जपायचा असेल तर काही गोष्टी करायलाच हव्या...
कोणापुढे हात पसरणे किंवा कोणाकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेवर जगणं सोडा...
गरजेपेक्षा जास्त बोलू नका. जेवढं तुम्हाला विचारलं जाईल तेवढंच सांगा. सल्ले देत बसू नका.
जे लोक तुमचं ऐकत नाहीत किंवा ज्यांना तुमच्या मताची किंमत नाही अशा लोकांच्या मागे- मागे फिरणं बंद करा.
ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं नाही, त्या ठिकाणी चुकूनही जाऊ नका.
कोणाकडून काही घेणाऱ्या व्यक्ती बनण्यापेक्षा दुसऱ्यांना काहीतरी सतत देणारी व्यक्ती म्हणून तुमची ओळख बनवा.
स्वाभिमान जपायचा तर आर्थिक स्वावलंबन खूप महत्त्वाचं आहे. ते कसं साधता येईल त्यासाठी प्रयत्न करा.
कोणी तुमचा विनाकारण अपमान केला तर तिथल्यातिथे सौम्य शब्दांत त्यांना उत्तर द्या.