घराघरात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
छोटीशी दिसणारी ही स्क्रीन मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर खोलवर परिणाम करत असते.
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन टाइम पूर्णपणे टाळावा. या काळात मुलांचा मेंदू वेगाने विकसित होत असतो, त्यामुळे मोबाईलऐवजी खेळांवर भर द्यावा.
२ ते ५ वयोगटांतील मुलांना दिवसातून फक्त तासभरच मोबाईल पाहू द्यावा. तोही पालकांच्या देखरेखीखाली आणि शैक्षणिक गोष्टींसाठीच असावा.
६ ते १२ वयोगटातील मुलांना शाळेच्या प्रोजेक्टसाठी इंटरनेटची गरज भासू शकते. पण, त्यांच्या हातात स्वतंत्र फोन देण्यापेक्षा कुटुंबाचा कॉमन टॅब किंवा लॅपटॉप वापरण्यास द्यावा.
१४ ते १६ वर्षांनंतरच मुलांना स्वतःचा स्वतंत्र फोन द्यावा. या वयात मुलं जबाबदारीने फोन हाताळण्यास सक्षम होतात.
फोन देण्यापूर्वी मुलाची गरज आणि त्याच्यातील परिपक्वता तपासा. फोनमध्ये 'पॅरेंटल कंट्रोल' सेट करायला विसरू नका.
फोन देण्यासोबतच त्यांना वाचन आणि मैदानी खेळांची आवड लावण्यासाठी प्रोत्साहन द्या.