रडणं ही भावना आहे. पण कधीकधी आपल्याला अश्रू रोखता येत नाही अशावेळी काय करावं?
काही प्रसंग असे असतात जिथे आपल्याला अश्रू रोखता येत नाही. पण काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्यावर भावना नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
रडू येते तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि तोंडातून हळूहळू श्वास सोडा. यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
जेव्हा रडावेसे वाटते तेव्हा आपले लक्ष विचलित करा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत मन वळवा.
थंड पाणी प्यायल्याने किंवा हात, पाय, चेहऱ्यावर स्पर्श केल्याने मज्जासंस्था शांत होते. त्यामुळे डोळ्यातून अश्रू येत नाहीत.
जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा स्वत:शी हळूवारपणे संवाद साधा. मी हे करु शकते हे सतत स्वत:ला समजवा.
आपल्याला आनंद देणारी आठवण अशावेळी आठवा. यामुळे आपला मूड चांगला होईल.
काही क्षण डोळे बंद करुन खोल श्वास घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे अश्रू थांबतील.
तोंडावर थंड पाणी शिंपडा, यामुळे अश्रू वेळीच येण्यास रोखले जातात.