फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?

प्लास्टिक, काच की स्टील... जाणून घ्या, फायदे अन् तोटे

फ्रिजमध्ये पाणी ठेवण्यासाठी हलक्या दर्जाच्या बाटल्या वापरल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. 

प्लास्टिकच्या बाटल्या सर्वात जास्त वापरल्या जातात कारण त्या हलक्या आणि स्वस्त असतात. 

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात केमिकल्स मिसळतात. BPA (बिस्फेनॉल ए) हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

पाणी साठवण्यासाठी काचेच्या बाटल्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात. कोणतंही केमिकल नसल्याने पाण्याची चव देखील तशीच राहते. 

काचेच्या बाटल्यांचा तोटा म्हणजे त्या जड असतात आणि लगेचच तुटण्याची शक्यता असते. 

स्टीलच्या बाटल्या लोकप्रिय होत आहेत. स्टीलच्या बाटल्या मजबूत, टिकाऊ आणि आरोग्यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात.

स्टीलच्या बाटल्या पर्यावरणासाठी देखील एक चांगला पर्याय आहेत कारण त्या पुन्हा वापरता येतात आणि दीर्घकाळ टिकतात. 

लाबूबू डॉल घरी आणणं शुभ की अशुभ?

Click Here