उडीद डाळ पौष्टिक असली तरी काही लोकांसाठी ती अपायकारक ठरू शकते.
उडीद डाळ ही प्रथिने, लोह आणि फायबरयुक्त असलेली पोषक डाळ आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
उडीद डाळ ही पचायला जड आणि उष्ण प्रकृतीची असते, यामुळेच ती प्रत्येकासाठी गुणकारी ठरतेच असं नाही.
उडीद डाळ ही जितकी पौष्टिक आहे, तितकीच काही लोकांसाठी ती त्रासदायक देखील ठरू शकते.
काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी उडीद डाळ खाल्ल्यास पोटफुगी, गॅस, अॅसिडिटी किंवा इतर शारीरिक त्रास वाढू शकतो.
शरीरातील युरिक ॲसिड वाढलेले असेल, तर उडीद डाळ खाणे टाळा. यामुळे सांधेदुखी आणि सूज येण्याची समस्या गंभीर होऊ शकते.
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांनी उडीद डाळ कमी प्रमाणात खावी. यात असलेल्या काही घटकांमुळे किडनीवर ताण येऊ शकतो.
उडीद डाळ 'वात' वाढवणारी असते. त्यामुळे ज्यांना संधिवात किंवा अंगदुखीचा त्रास आहे, त्यांनी उडीद डाळ मर्यादित प्रमाणात खावी.
मूळव्याधाचा त्रास असलेल्या लोकांसाठी उडीद डाळ त्रासदायक ठरू शकते, कारण यामुळे बद्धकोष्ठता वाढण्याची शक्यता असते.
उडीद डाळ खाताना नेहमी त्यात हिंग आणि आल्याचा वापर करावा, जेणेकरून गॅसचा त्रास कमी होईल.