महागड्या ड्राय फ्रूट्सपेक्षा थंडीत शेंगदाणा चिक्की खाण्याचे ७ फायदे... 

गोड, कुरकुरीत आणि पौष्टिक असलेली चिक्की हिवाळ्यात खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात.

हिवाळा आला की शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची गरज वाढते. अशाच पारंपरिक आणि आरोग्यदायी पदार्थांपैकी एक म्हणजे शेंगदाण्याची चिक्की. 

गोड, कुरकुरीत आणि पौष्टिक असलेली चिक्की हिवाळ्यात खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती असलेली शेंगदाण्याची चिक्की आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे ते पाहा. 

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून संरक्षण मिळते.

शेंगदाणे आणि गूळ यामध्ये भरपूर कॅलरीज असल्यामुळे चिक्की खाल्ल्याने लगेच इन्स्टंट ऊर्जा मिळते.

चिक्कीमधील पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी-खोकल्यापासून बचाव करतात.

शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

गुळामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

हिवाळ्यात कोरडी पडणारी त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास चिक्की मदत करते.

हिवाळ्यात जेव्हा शरीराला उबदार राहण्यासाठी जास्त कॅलरीची गरज असते, तेव्हा चिक्की एक उत्तम 'एनर्जी बार' म्हणून काम करते.

Click Here