दिवाळी फराळातून हरवलेले 'ते' पारंपरिक ७ पदार्थ... 

फराळाच्या ताटातून विस्मृतीत गेलेले 'ते' चविष्ट पदार्थ नेमके कोणते ते पहा...

आजी-पणजीच्या काळात असे काही खास पारंपरिक पदार्थ फराळात असायचे, जे आजकालच्या धावपळीत क्वचितच पाहायला मिळतात. 

कडबोळी चकलीसारखाच मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ, चकली अधिक सोपी असल्याने कडबोळी फार कमी लोक करतात.

बेसनाचे सारण भरून, साठ्याचे थर लावून, पुडाच्या वड्यांना विशिष्ट चौकोनी किंवा त्रिकोणी आकार दिला जायचा.

गव्हाचे पीठ, बेसन आणि मसाले वापरून तयार केलेली ही लाटी वडी चवीला खूप खमंग लागायची. लाटी वडी हा फराळातला एक झणझणीत पदार्थ असायचा. 

दुधातील कान्होले एक प्रकारची छोटी, गोड पुरी किंवा शंकरपाळीसारखा आकार दिलेला पदार्थ असायचा, जो साध्या दुधात किंवा केसर-वेलची घातलेल्या घट्ट रबडीत बुडवून खाल्ला जायचा.

चिरोटे नाजूक आणि सुंदर लेयर्स असलेला पदार्थ. साजूक तुपात तळून त्यावर पिठीसाखर शिंपडायची. चिरोटेआजकाल क्वचितच केले जातात. 

आजकाल शंकरपाळे बनवतात, पण पारंपरिक गुळाच्या पाकात घोळवलेले सक्करपारे आता फारच क्वचितच दिसतात. 

पूर्वी गूळ, पोहे आणि खोबरं वापरून बनवलेले लाडू दिवाळीच्या दिवशी खास केले जायचे. या लाडूंना हलकी गोड चव आणि पारंपरिक सुगंध असतो.

Click Here