केसांना मेहेंदी लावल्यानंतर, रंग उडू नये आणि केसांना नैसर्गिक चमक मिळावी म्हणून मेहेंदी भिजवताना त्यात नेमकं काय घालावं...
केसांना लावलेल्या मेहेंदीचा रंग गडद व्हावा आणि जास्त काळ टिकून राहावा, यासाठी मेहेंदी भिजवताना काही घरगुती पदार्थांचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते.
मेहेंदी भिजवण्यासाठी चहा पावडर उकळलेले पाणी वापरा. यामुळे मेहेंदीला गडद तपकिरी रंग येतो आणि तो केसांवर जास्त काळ टिकतो.
लिंबाचा रस मेहेंदी भिजवताना घाला. लिंबामधील आम्ल गुणधर्मांमुळे मेहेंदीचा रंग केसांना अधिक चांगल्या प्रकारे येतो आणि केसांवरील रंग उडण्यापासून रोखतो.
मेहेंदीमध्ये बीटचा रस मिसळा, यामुळे केसांना अतिशय सुंदर आणि गडद शेड मिळते.
मेहेंदी भिजवताना त्यात ४ ते ५ थेंब नीलगिरीचे तेल घाला. हे तेल मेहेंदीचा रंग अधिक गडद करण्यास मदत करते आणि केसांच्या मुळांनाही पोषण देते.
आवळा पावडर घातल्यामुळे केसांवर रंग येण्यासोबतच, मेहेंदीचा रंग अधिक पक्का होण्यास मदत होते.
मेहेंदी नेहमी लोखंडी कढईत रात्रभर भिजवून ठेवा. लोखंडाशी प्रक्रिया झाल्यामुळे मेहेंदीला नैसर्गिक काळा-गडद रंग येतो जो केसांवर दीर्घकाळ टिकतो.
उकळलेल्या कॉफीच्या पाण्यात मेहेंदी भिजवा, रंग गडद होतो आणि नैसर्गिक तपकिरी शेड मिळते.
मेहेंदीमध्ये २ ते ३ चमचे दही मिसळा. केस मऊ होतात रंग केसांवर टिकून राहतो व कोरडेपणा कमी होतो.