'या' ८ अभिनेत्री आहेत बॉलिवूडमधील फिटनेस क्वीन... 

काही अभिनेत्री वय, बिझी शूटिंग शेड्युल आणि कामाचा ताण असूनही स्वतःला अतिशय फिट ठेवतात.

बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच फिटनेसला देखील खूप महत्त्व दिले जाते.

काही अभिनेत्री वय, बिझी शूटिंग शेड्युल आणि कामाचा ताण असूनही स्वतःला अतिशय फिट ठेवतात. 

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री, ज्या फिटनेसच्या बाबतीत सगळ्यांसाठी रोल मॉडेल आहेत त्या नेमक्या कोण आहेत... 

दिशा पटानी तिची टोन्ड फिगर आणि लवचिकपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी ॲक्रोबॅटिक्स आणि मार्शल आर्ट्स करण्यावर अधिक भर देते. 

जॅकलिन फर्नांडिस फिटनेस रुटीनमध्ये डान्स, फंक्शनल ट्रेनिंग आणि पिलाटेस सारखे हाय इंटेन्सिटी वर्कआउट करते, त्यामुळे ती तरुणाईची फिटनेस आयडल आहे.

वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोरा आपल्या योगा, पिलाटेस आणि स्ट्रेचिंगमुळे जबरदस्त फिट दिसते.

 'योगा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी नियमितपणे प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि वेगवेगळ्या आसनांचा सराव करते.

सोहा अली खान फिट राहण्यासाठी संतुलित फिटनेस रुटीन फॉलो करते. डेली रुटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फंक्शनल वर्कआउट्सचा समावेश असतो. 

योगा, कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करत दीपिका फिटनेसोबतच मेंटल हेल्थलाही प्राधान्य देते.

बिपाशा बसू स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी ती स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ वर्कआउट्स आणि योगाचा नियमित सराव करते.

Click Here