वेळीच स्वतःला योग्य सवयी लावल्यास शुगर स्पाइक टाळता येतात आणि आपल्याला दिवसभरासाठी अधिक ऊर्जा मिळते.
सकाळी उठल्यानंतर आपण जे काही करतो, त्याचा थेट परिणाम आपल्या 'इन्सुलिन' निर्मितीवर आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो.
सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी पुरेसं पाणी प्या. यामुळे रात्रभराचा उपवास सुटतो आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.
दिवसाची सुरुवात प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ जसे दही, सुका मेवा, सीडस, भाज्या खाऊन करावी.
नाश्ता केल्यानंतर कॉफी पिणे किंवा कॅफीनचे प्रमाण मर्यादित ठेवा, नाहीतर रक्तातील साखरेची पातळी अचानकपणे वाढते.
चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्याने रक्तातील साखरेचा वापर ऊर्जा म्हणून होतो आणि शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे इन्सुलिनचे कार्य सुधारते आणि शुगर लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते.