मंगळागौरीला घ्या सोपे उखाणे 

मंगळागौरीची पूजा झाल्यावर रात्री जागरण, खेळ, गप्पा, गाणी रंगतात आणि नव्या नवरीला उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो, त्यासाठी हे पर्याय. 

पूर्वी बायका नवऱ्याचे नाव घेत नसत, अशावेळी उखाणा हे पतीराजाचे नाव घेण्याची त्यांच्यासाठी पर्वणी असे, आताही उखाणा ऐकण्यात गंमत असते. 

तुम्हीसुद्धा कोणाकडे मंगळागौरीच्या पूजेला जाणार असाल तर हे सोपे उखाणे पाठ करून जा, सगळ्यांकडून वाहवा मिळवाल. 

श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…मंगळागौरीच्या दिवशी ….रावांचे नाव घेते आणि फुलवते संसाराचा फुलोरा

भर श्रावणात पाऊस आला जोरात…रावांचे नाव घेते मंगळगौरीच्या दिवशी ….च्या घरात 

मेघमल्हार बहरताच, श्रावणसर कोसळते, …रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते 

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी, ….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी 

अथांग वाहे सागर, संथ चालते होडी, मंगळागौरी सुखी ठेवो …..रावांची आणि माझी जोडी

मंगळागौरी तू आशीर्वाद दे, येऊ दे भाग्याला भरती….च्या उत्कर्षाची कमान, नेहमी राहू दे चढती..!

सासर आहे छान, सासू आहे हौशी…. रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

मंगळागौरी देवी नमन करते तुला,…रावांच्या नावाचे अखंड सौभाग्य लाभू दे मला

Click Here