पहिल्या श्रावण शुक्रवारी असा करा बेत 

श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीची पूजा करता. यंदा श्रावणाचा पहिल्या शुक्रवारी काय बेत करायचा, असा प्रश्न पडलाय. तर हा बेत करा.

श्रावण महिन्यात नैवेद्यासाठी काही खास पदार्थ केले जातात. पहिल्या शुक्रवारी शेवयांच्या खीरीचा बेत करू शकता. 

पहिल्याच शुक्रवारी पुरणाचा नैवेद्या दाखवायचा असेल, तर कडबू करू शकता. कडबूच्या नैवेद्याचा पर्यायही उत्तम आहे. 

नैवेद्यासाठी गाेड पदार्थ म्हणून बदाम, काजू, मनुके घालून साजूक तुपातला शिराही बनवू शकता. 

खीर किंवा कडबू बराेबर तिखट हिरवी चटणी नक्की करा. काेथिंबीर आणि पुदिना एकत्र करून केलेल्या चटणीला वेगळा स्वाद येताे. 

काेशिंबीरीमध्ये काकडीची काेशिंबीर करा, त्यात ओला नारळ घालायला विसरू नका. 

पटकन हाेणारी आणि सर्वांच्या आवडीची बटाट्याची भाजी करा. उकडलेल्या बटाट्यांची भाजी पटकन हाेते, तुमचा वेळ वाचण्यास मदत हाेईल. 

खीर, बटाट्याची भाजी असा बेत ठरवत असाल, तर ताटाची लज्जत वाढवण्यासाठी नक्कीच पुऱ्या करा. 

नैवेद्याच्या ताटात वरण भात आणि तूप हे हवेच. त्याचबराेबर लिंबाची फाेडही हवीच. 

वरण भाताबराेबरच थाेडा तिखट असा मसालेभात आणि त्यावर तुपाची धार असा फक्कड बेत आखू शकता. या पदार्थांमुळे नैवेद्याचे ताट एकदम हाेईल झक्कास. 

Click Here