सकाळच्या गडबडीत भाज्यांमध्ये घालण्यासाठी आलं - लसूण पेस्ट करायला वेळ मिळत नाही. आता टेन्शन घेऊ नका, अशा पद्धतीने पेस्ट बनवा, तुमच्यासाठी खास टिप्स.
अनेकदा आलं - लसूण पेस्ट करून ठेवली की, त्याची चव बदलते, अशी तक्रार आता येणार नाही. कारण या पद्धतीने टिकाऊ आलं - लसूण पेस्ट बनवू शकता.
टिकाऊ आलं लसूण पेस्ट बनवायची असल्यास त्यामध्ये आल्याचे प्रमाण ६० टक्के आणि ४० टक्के लसणू असे प्रमाण घेऊन पेस्ट तयार करावी.
आलं - लसूण पेस्टमध्ये अर्धा चमचा मीठ, एक चमचा व्हिनेगर आणि १ चमचा माेहरीच तेल घाला. यामुळे पेस्टला चवदेखील चांगली येते.
जास्त काळ आलं - लसूण पेस्ट करून ठेवायची असल्यास त्यामध्ये व्हिनेगर घालून एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा.
आलं - लसूण पेस्ट करून ती माेहरीच्या तेलात चांगली फ्राय करून घ्या. थंड झाल्यावर हवा बंद झाकणाच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा.
आलं - लसूण पेस्ट नेहमी हवा बंद झाकण असलेल्या डब्यात ठेवावी. पेस्ट वापरून झाल्यावर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावी. जास्तकाळ बाहेर ठेवू नये.
ग्रेव्ही, रस्सा भाजी, पराठ्याच्या सारणात घालण्यासाठी आलं - लसूण पेस्ट सर्रास वापरली जाते. पण, करून ठेवलेल्या पेस्टने ताेच स्वाद येईल.