श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला दीप आमावस्या साजरी करतात. या दिवशी मुलांचे औक्षण करण्याचे एक विशेष कारण आहे.
श्रावणाची चाहुल लागली की उत्साह, आनंदाचे वातावरण दिसून येते. पण, श्रावणाच्या पूर्वसंध्येला मात्र आमावेस्यमुळे अंधार पसरलेला असताे.
दीप आमावस्येला दिव्यांची पूजा करून दीप प्रज्वलन केले जाते. दिव्यांच्या या मंद प्रकाश काळाेख्या रात्रीला भेदून जाताे.
दिव्यांच्या आवसेला घरातल्या लहान मुलांचे औक्षण केले जाते. कारण, हीच लहान मुलं पुढे दैदिप्यमान कामगिरी करणार आहेत, असा विश्वास असताे.
या मुलांचे आयुष्य दिव्यांच्या प्रकाशासारखे उजळून जावे. अंधारातही त्यांना चांगला मार्ग मिळावा, यासाठी त्यांचे औक्षण करावे.
राेज साधारणत: देवासमाेर एकच दिवा लावला जाताे. पण, दीप आमावस्येच्या दिवशी जास्तीत जास्त दिवे लावण्याची प्रथा आहे.
दिव्यांमुळे घरातला अंधार दूर हाेईन मंगलमय प्रकाश पसरताे, यातून आपल्याला शिकवण मिळते.
आपल्या आयुष्यात अंधार आला, तरी खचून न जाता प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्याची शिकवण आपल्याला यातून मिळते.