आता तुम्हाला रडवणार नाही कांदा, फक्त 'या' टीप्स करा फॉलो
कांदा कापताना हमखास डोळ्यात पाणी येतं, डोळ्यांची जळजळ होते.
कांद्यामध्ये असलेले सल्फर कम्पाऊंड हे कापल्यानंतर हवेत मिसळल्याने हा त्रास होतो.
कांदा कापण्यापूर्वी त्याची साल काढून तो २ ते ३ तास फ्रीजमध्ये ठेवा.
कांदा कापण्यासाठी धारदार चाकू वापरा जेणेकरून कांदा लवकर कापता येईल.
कांदा कापण्यापूर्वी तो १० ते १५ मिनिटं पाण्यात टाकून ठेवा.
कांदा वरच्या बाजूने चिरल्याने डोळ्यांची जळजळ होते. म्हणूनच कांदा मुळापासून म्हणजेच खालच्या बाजूने चिरा.