वारंवार किडनी स्टोनचा त्रास छळतो, टाळा हे ७ पदार्थ... 

किडनी स्टोन होऊ नये म्हणून काही पदार्थांपासून कायम दूर राहणं गरजेचे असते.

किडनी स्टोन होऊ नये म्हणून काही पदार्थांपासून कायम दूर राहणं गरजेचे असते. 

कोणते ७ पदार्थ किडनीसाठी हानिकारक ठरू शकतात ते पाहूयात... 

कोल्डड्रिंक्स टाळावेत. यातील फॉस्फोरिक ॲसिड व साखरेचे प्रमाण यामुळे लघवीत कॅल्शियम व ऑक्सेलेटची पातळी वाढून किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. 

पालक व बीट यांमध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण खूप जास्त असते, जे किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे पालक व बीट खाऊ नये. 

डेअरी प्रॉडक्ट्स जसे पनीर, चीज खाऊ नये. यातील कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. 

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. चिप्स, पॅक केलेले स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.

नट्स, सीड्स व ड्रायफ्रूट्स यांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. 

लिंबू, संत्री यामध्ये व्हिटामिन 'सी' जास्त प्रमाणात असते, व्हिटामिन 'सी' अधिक प्रमाणात घेतल्यास ऑक्सलेटचे प्रमाण वाढून किडनी स्टोन होऊ शकतो. 

चॉकलेटमध्येही ऑक्सलेट असते. त्यामुळे, वारंवार किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर चॉकलेट खाणे टाळावे.

Click Here