पौष्टिक खिचडीचे 'हे' ५ प्रकार आहेत वेटलॉससाठी खास...
'खिचडी' सर्वात हेल्दी आणि पोटासाठी हलकी डिश मानली जाते.
'खिचडी' सर्वात हेल्दी आणि पोटासाठी हलकी डिश मानली जाते.
खिचडीमध्ये प्रथिने, फायबर आणि कर्बोदके फार मोठ्या प्रमाणावर असतात, यामुळे वेटलॉस करण्यासाठी खिचडी खाणे फायदेशीर ठरते.
खास ५ प्रकारच्या पौष्टिक खिचडी पाहूयात, ज्या वेटलॉस करण्यासोबतच, चवीलाही अतिशय स्वादिष्ट लागतात.
पालक - मूग डाळीची खिचडी प्रोटीनयुक्त असून, पोट दीर्घकाळ भरलेले रहाते, यामधील फायबर वेटलॉस करण्यास मदत करते.
दलिया हे उत्तम कर्बोदक आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. यात ब्रोकोली, गाजर, फरसबी यांसारख्या विविध हिरव्या भाज्या टाकल्यास पोषणमूल्ये वाढतात आणि भूक नियंत्रित राहते.
व्हेजिटेबल ओट्स खिचडी वेटलॉससाठी फायदेशीर असते. ओट्समुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि कॅलरी बर्निंग जलद होते. गाजर, शेंग, मटार यासारख्या भाज्यांमुळे ही डिश अधिक फायबरयुक्त होते.
मसूर, चणा आणि तूर यांसारख्या मिश्र डाळींच्या खिचडीत प्रथिनांचे प्रमाण अधिक असते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
क्विनोआमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक जास्त असते. यात पनीर किंवा टोफू मिसळून बनवलेली खिचडी अधिक पौष्टिक होते. ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.