रात्री झोप येत नाही? करीना कपूरच्या डायटिशियनने सांगितले चार जादुई उपाय!
पुरेशी झोप आरोग्यासाठी महत्वाची, काही खास टिप्स तुमच्या कामात पडू शकतात.
बॉलीवूडची 'बेबो' म्हणजेच करीना कपूर खान कायमच चर्चेत असते. दोन मुलांची आई असूनही करीना आजही तितकीच फिट आहे.
करीनाच्या या एव्हरग्रीन फिटनेसचे सर्वात मोठे श्रेय तिची प्रसिद्ध डाएटिशियन ऋजुता दिवेकरला जाते.
नुकतंच ऋजुतानं एक खास पोस्ट शेअर केली असून, ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही किंवा मध्येच जाग येते, अशा लोकांसाठी काही जादुई घरगुती उपाय सांगितले आहेत.
जर तुम्हाला पायात गोळे येऊन जाग येत असेल, तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. अशा वेळी पाणी पिणे आणि दिवसभरात पाण्याचे प्रमाण वाढवणे फायदेशीर ठरते.
रात्री घसा कोरडा पडणे, खोकला येणे किंवा गुदमरल्यासारखे वाटून जाग येत असेल, तर तोंडाच्या एका बाजूला खडीसाखर ठेवा. यामुळे घसा ओलसर राहतो आणि पुन्हा सहज झोप लागते.
झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना थोडे तूप लावून मसाज करा. यामुळे मन शांत होते आणि गाढ झोप लागते.
रात्री अचानक जाग आली आणि भूक लागल्यासारखे वाटत असेल, तर राजगिऱ्याचा लाडू खाणे उत्तम. हे हलके, पौष्टिक आणि पचायला सोपे असतात, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि पुन्हा शांत झोप लागण्यास मदत होते.