K3G सिनेमातला क्रिश पाहा आता कसा दिसतो?

बलकलाकार म्हणून गाजलेला हा मुलगा नक्की आहे तरी कोण ?

काही चित्रपटातील पात्रे वर्षानुवर्षे लक्षात राहतात. तसाच एक चित्रपट म्हणजे कभी खुशी कभी गम. फक्त शाहरुख आणि काजोलच नाही तर चित्रपटातील इतरही पात्रे सगळ्यांच्या फार पसंतीस पडली. 

शाहरुख आणि काजोलच्या मुलाची भूमिका करणारा बालकलाकार तेव्हा क्यूट आणि गोंडस म्हणून फार गाजला होता. क्रिशची भूमिका साकारणारा जिबरान सध्या पुन्हा चर्चेत आहे. 

K3G मधील कृषी म्हणजेच जिबरान खान फक्त या एकाच चित्रपटात नाही तर बडे दिलवाले, क्यू की.. मैं झुठ नही बोलता , रिश्ते या काही गाजलेल्या चित्रपटांमध्येही बालकलाकार होता. 

विष्णू पुराण या मालिकेतील लहान ध्रुवची भूमिका जिबरानने साकारली होती. लहानपणी जिबरानने केलेल्या त्याच्या भूमिका चांगल्या लोकप्रिय ठरल्या. 

जिबरान सध्या ३१ वर्षाचा आहे आणि त्याचे क्यूट टू हॉट ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच चकित झाले. सोशल मिडियावर जिबरानचे भरपूर चहाते आहेत. 

ब्रम्हास्त्र या चित्रपटात त्याने सह निर्देशन केले तसेच इश्क रिबाऊंड या २०२४ साली आलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका केली. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळाला. 

जिबरान खान सध्या एक कलाकार म्हणून लोकांच्या पसंतीस पडणारा नवा चेहरा आहे. 

Click Here