मासिक पाळीत डार्क चॉकलेट खाल्ल्याने वेदना खरंच कमी होतात का? जाणून घ्या.
डार्क चॉकलेट हे मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे. मासिक पाळी दरम्यान चॉकलेट खाल्ल्याने गर्भाशयाला आराम मिळतो.
या काळात क्रॅम्प्स आणि पेटके येतात अशावेळी डार्क चॉकलेट खायला हवे.
शरीरातील एंडोर्फिन आणि सेरोटोनिन सारखे फील गुड हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे आपला ताण कमी होऊन मूड सुधारतो.
मासिक पाळीमुळे रक्त कमी होते. अशावेळी डार्क चॉकलेट खाणे चांगले आहे.
यावेळी पोटफुगी आणि जडपणा टाळता येतो.
डार्क चॉकलेटमध्ये असणारे घटक रक्ताभिसरण आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.
मासिक पाळीत गोड खाण्याची तीव्र इच्छा होते अशावेळी डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरेल.