पॅडेड ब्राचा सॉफ्टनेस आणि शेप कायम टिकवण्यासाठी ती नेमकी कशी धुवावी ते पाहा...
पॅडेड ब्रा अनेकदा चुकीच्या पद्धतीने धुतल्यामुळे तिचा आकार बिघडतो आणि ती लवकर खराब होते.
पॅडेड ब्रा चा शेप टिकवून ठेवायचा असेल, तर ती धुताना काही खास टिप्स फॉलो करणं आवश्यक आहे.
पॅडेड ब्रा ची फिटिंग फिट आणि शेप दोन्ही कायम ठेवतील अशा ७ टिप्स...
मशीन वॉशमुळे पॅडेड ब्रा चा आकार खराब होतो. म्हणून ती नेहमी सौम्य साबण किंवा डिटर्जंटच्या मदतीने हाताने धुवावी.
थोडावेळ कोमट पाण्यात ब्रा भिजवून ठेवा आणि नंतर सौम्यपणे धुवा.
फार गरम पाणी टाळा, कोमट पाणी फॅब्रिक आणि पॅडिंगसाठी योग्य असते.
पॅडेड ब्रा चा शेप कायम तसाच ठेवण्यासाठी ती पिळू नये. हलक्या हाताने दाब देऊन किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून जास्तीचे पाणी काढा.
ब्रा वळवण्यासाठी हँगरला अडकवू नका सपाट पृष्ठभागावर वाळवण्यासाठी ठेवा. हँगरला लटकून ब्रा चे पट्टे सैल होतात.
वॉशिंग मशीनमध्ये धूत असाल तर मॅश बॅगेत ब्रा भरुन ,मगच ती बॅगेसहित मशीनमध्ये धुवायला टाकावी.