केस वाढतील भराभर, या पद्धतीने लावा कांद्याचा रस 

केसगळती, तुटणे किंवा कोंडा होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर कांद्याचा रस केसांना लावून पाहा. 

सगळ्यात आधी २ ते ३ मध्यम आकाराचे कांदे सोलून चिरून घ्या. 

त्यांना मिक्सरमध्ये बारीक करा आणि कापड किंवा चाळणीतून रस गाळून घ्या. 

कापसाच्या बोळ्याने किंवा बोटांनी कांद्याचा रस थेट टाळूवर लावा. 

रस मुळांना व्यवस्थित पोहोचावा म्हणून ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. 

केसांवर हा रस ३० ते ४० मिनिटे तसाच राहू द्या. 

यानंतर केसांना सौम्य शाम्पूने धुवा, ज्यामुळे त्याचा वास निघून जाईल. 

आठवड्यातून २ ते ३ वेळा याचा वापर केल्यास केसगळती कमी होते. तसेच केस लांब आणि मजबूत होतात. 

Click Here