केसांचं तुटणं थांबवण्यासाठी स्वतःला लावा ८ सवयी... 

तुमच्या रोजच्या सवयींमध्ये छोटे बदल करून तुम्ही केसांचे तुटणे कायमचे थांबवू शकता.

केसांमधील नैसर्गिक तेल टिकवून ठेवण्यासाठी नेहमी सल्फेट- फ्री आणि सौम्य शाम्पू निवडा. यामुळे केस कोरडे न पडता, तुटण्याचे प्रमाणही कमी होते.

ओले केस जोरात पुसणे किंवा विंचरणे टाळा. केस पुसण्यासाठी मऊ सुती कापडाचा किंवा जुन्या टी-शर्टचा वापर करा.

झोपताना सुती उशीऐवजी सिल्क किंवा सॅटिनच्या उशीचा वापर करा. यामुळे केसांमधील घर्षण कमी होते आणि केस गुंता होऊन तुटत नाहीत.

केसांच्या खालच्या बाजूला फाटे फुटल्यामुळे केस वरपर्यंत तुटत जातात. त्यामुळे दर ६ ते ८ आठवड्यांनी केसांची टोक ट्रिम करणे गरजेचे आहे.

केस विंचरताना खालच्या टोकांकडून सुरुवात करून हळूहळू वरच्या बाजूला जा. यामुळे केसांवर ताण पडत नाही आणि केस कमी तुटतात.

हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्नचा अतिवापर केसांमधील ओलावा शोषून घेतो. शक्यतो नैसर्गिकरित्या केस वाळू द्या किंवा 'हीट प्रोटेक्टंट' वापरल्याशिवाय स्टाईलिंग करू नका.

केसांच्या लवचिकतेसाठी शरीर हायड्रेटेड असणे आवश्यक असते. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो.

केसांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिने,ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करा. सुकामेवा  हिरव्या पालेभाज्या केसांसाठी 'सुपरफूड' आहेत.

Click Here