सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय कोणते करायला हवे पाहूया.
चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन आणि सुरकुत्यांमुळे चमक कमी होते. ऊन, वाढते वय, हार्मोन्स बदल आणि त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावर डाग दिसू लागतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी काय करायला हवं पाहूया.
सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोरफडीचा गर लावा. यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला चमक येते.
तांदळाचा फेस पॅक त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतो.
बटाट्याच्या रसात तांदळाचे पीठ मिसळून त्वचेला लावल्यास उजळण्यास मदत होईल.
यात टोमॅटो घालून सर्व साहित्य एकजीव करा. त्याची पेस्ट तयार होईल.
हा फेसपॅक त्वचेला ३० मिनिटे लावून ठेवा.
सुकल्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय रोज केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.