फॉलो करा 'हे' रुटीन; केस राहतील दाट आणि मजबूत
उन्हाळ्यात स्काल्प तेलकट होतो, जास्त घाम येतो. कडक उन्हामुळे केस कमकुवत होऊन गळतात.
केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पूचा वापर करा, जो स्काल्प स्वच्छ ठेवेल, ज्यामुळे केस गळणं कमी होतं.
नारळाच्या, बदामाच्या तेलाने आठवड्यातून दोनदा स्काल्पचा मसाज करा, यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं.
हिरव्या पालेभाज्या, फळं, ड्राय फ्रूट्स केसांना पोषण देतात, केस मजबूत होतात.
उन्हात बाहेर पडताना केस झाका. स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा.
उन्हाळ्यात पाणी प्या. जेणेकरून शरीर, स्काल्प हायड्रेटेड राहील. पाण्याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात.