कोथिंबीर ही रोजच्या वापरातली वस्तू, ऋतुमानानुसार तिचे भाव कमी अधिक होत राहतात, अशा वेळी घरातच कोथिंबीरिचे रोपटे लावले तर?
कोथिंबीर लावण्याची पद्धत सोपी असली तरी अनेकांना तिच्या वाढीसाठी काय करावे हे माहीत नसते, त्यासंदर्भात टिप्स जाणून घेऊ.
पावसाळ्यात कोथिंबीर लावणे उत्तम, मातीला ओल असते, धने लवकर रुजतात आणि लवकर अंकुरित होतात.
धने हातावर चोळून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी मातीत सर्वत्र पेरून घ्या.
कोथिंबीर लावण्यासाठी कुंडी उपयोगाची नाही, तर पसरट, खोलगट ट्रे वापरणे केव्हाही चांगले. त्याला पाच-सहा छिद्र पाडून घ्या.
मातीत पुरेसे पाणी घाला, त्याचा चिखल होता कामा नये. त्यात कोकोपीट, कम्पोस्ट आणि थोडी रेती घाला, धने छान रुजतात.
चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कोथिंबीरीचे रोप ठेवा.
पावसाळ्यात या रोपाला खूप पाणी घालू नका, मातीची ओल जास्त असेल तर कोथिंबिरीची वाढ होणार नाही.
कोथिंबीर उगवल्यावर तिची वेळोवेळी छाटणी करा आणि वारंवार कोथिंबीर यावी म्हणून दर आठवड्याला धने पेरत राहा.
अशा तऱ्हेने कोथिंबीर लावाल तर तुम्हाला बारमाही ताजी कोथिंबीर घरच्या घरी मिळेल, ती सुद्धा फुकट!