लिपस्टिक जास्त काळ ओठांवर टिकवण्यासाठी ही ट्रिक वापरुन पहा.
लिपस्टिक हा मेकअपचा आवश्यक भाग आहे. जो आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतो.
पण अनेकदा ओठांवर लिपस्टिक अधिक काळ टिकत नाही. काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर ती जास्त काळ राहिल.
सगळ्यात आधी आपल्या ओठांना मध आणि साखरेचा स्क्रब लावावा लागेल. हे आठवड्यातून २ ते ३ वेळा ओठांना लावून हलक्या हाताने मसाज करा.
कोरड्या ओठांना लिपस्टिक लावू नका. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना मॉइश्चरायझर लावा.
लिप लाइनर लावताना ओठांवर डाग पडणार नाही याची काळजी घ्या.
लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर टिश्यू पेपर ठेवा. आणि ब्रशने पावडर लावा. ज्यामुळे ती सेट होईल.
लिक्विड लिपस्टिक किंवा लिप टिंटचा वापर करा.