झेंडूच्या रोपाला फुले येण्यासाठी १ खत कुंडीत घाला.
झेंडूच्या फुलांना बरह येण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.
कुंडीत आपण नायट्रोजन आणि पोटॅशियम असलेली खते घालायला हवी. त्यासाठी शेणखत, एप्सम क्षार आणि समुद्री खताचा वापर करा. यामुळे झेंडूच्या फुलांची संख्या वाढेल.
कुंडीसाठी ४० टक्के नदीची वाळू, २० टक्के गांडूळखत आणि ४० टक्के बागेतील माती यांचे मिश्रण वापरा. ज्यामुळे झाडाची मुळे चांगली विकसित होतील.
पावसाळ्यात झेंडूच्या कलमांची लागवड करण्यासाठी सर्वात योग्य महिना मानला जातो. यामुळे काही महिन्यात रोपाला बहर येईल.
बियांपासून रोपांची लागवड करण्यापेक्षा रोपांपासून करा. ज्यामुळे लवकर फुले येतील.
रोपाला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या.
मातीचा वरचा थर कोरडा असतानाच पाणी द्या. कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करा.