'हा' ज्यूस प्याल तर आजारापासून लांब राहाल

कोणता आहे 'हा' आरोग्यदायी ज्यूस अन् बनवायचा कसा?

गाजर आणि आवळ्याचा ज्यूस हे एक नॅचरल हेल्थ ड्रिंक आहे, ज्याचा शरीराला खूप फायदा होतो. 

गाजरामध्ये व्हिटॅमिन A, बीटा कॅरेटीन असतं, जे डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 

आवळा व्हिटॅमिन C चा उत्तम सोर्स असून यामुळे इम्यूनिटी वाढते. आजारापासून आपलं रक्षण होतं.

गाजर, आवळा, आलं, मध आणि पाणी घेऊन हा ज्यूस तयार करता येतो. 

हे सर्व साहित्य नीट धुवून घ्या. २ गाजर, २ आवळा, थोडं आलं याचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये टाका. 

थोडं पाणी घातल्यानंतर चवीनुसार मध घाला, ज्यूस तयार होईल. 

गाजर-आवळ्याचा ज्यूस सकाळी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. 

प्लास्टिक, लाकूड की मार्बल... कोणता चॉपिंग बोर्ड सेफ? 

Click Here