हिवाळ्यातही झटपट वेटलॉस करण्यासाठी करा फक्त ७ गोष्टी... 

थंडीच्या दिवसांत भूक वाढते, एक्सरसाइज कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्याची समस्या अनेकदा सतावते.

थंडीच्या सिझनमध्ये लाईफस्टाईलमध्ये काही सोपे बदल करून स्वतःला फिट ठेवू शकता.

थंडीच्या दिवसांत खास ७ सवयी, थंडीतही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी मदत करतील.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यांत लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्यास थंडीतही वेटलॉस करण्यास मदत होते.   

दिवसभरातून एकदा आलं आणि दालचिनीचा चहा प्यायल्यास झटपट वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते. 

 रोजच्या आहारात बाजरी, नाचणी, ज्वारी यांसारख्या भरडधान्यांचा समावेश करावा, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 

रोजच्या जेवणात ताज्या हिरव्या भाज्या आणि सॅलॅड न चुकता खावे. 

रात्री झोपण्यापूर्वी हळद घालूंन दूध प्यायल्याने शरीर आतून डिटॉक्स होते आणि फॅट्स बर्निंग अधिक वेगाने होऊ लागते.

रोज जवळपास २० ते २५ मिनिटे चालण्याचा व्यायाम आणि एक्सरसाइज केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. 

नेहमीच्या आहारात तीळ, गूळ, मेथी याचा समावेश करावा, यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि सतत भूक देखील लागण्याचे प्रमाण कमी होते.

Click Here