महागडी बनारसी साडी विकत घेताना ती असली आहे की बनावट ओळखण्याच्या खास ट्रिक्स...
बनारसी साडी तिच्या आकर्षक झरी कामामुळे आणि उत्कृष्ट विणकामामुळे जगभर प्रसिद्ध आहे. कोणतेही शुभ कार्य किंवा लग्नसोहळा बनारसी साडीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
बनारसी साडी खरेदी करताना अस्सल आणि शुद्ध बनारसी साडी कशी ओळखायची, हा प्रश्न अनेकांना पडतो.
साडीच्या झरीच्या भागाच्या डिझाईन मागच्या बाजूला बघा. अस्सल साडीमध्ये धाग्यांचे किंवा विणकामाचे जाळे स्पष्टपणे दिसेल. जर मागचा भाग गुळगुळीत असेल, तर ती बनावट असू शकते.
अस्सल बनारसी साडी शुद्ध सिल्क आणि नैसर्गिक झरी वापरून तयार केली जाते. साडीचा पोत खूप मऊ आणि गुळगुळीत असतो.
अस्सल बनारसी साडी बनवायला अनेक आठवडे लागतात. त्यामुळे ती कधीही स्वस्त मिळत नाही. जर विक्रेता खूप कमी किंमत सांगत असेल, तर ती साडी बनारसी सिल्क मिक्स किंवा बनावट असण्याची शक्यता जास्त आहे.
अस्सल बनारसी साडीत सोने किंवा चांदीच्या मिश्रित धातूची झरी वापरली जाते. ती थोडी उठावदार आणि जास्त चमकदार नसेल. बनावट झरी जास्त चमकेल आणि लवकर काळपट पडेल.
काही अस्सल साड्यांवर 'सिल्क मार्क इंडिया' लेबल किंवा बनारसी उत्पादनाचा स्टॅम्प असतो. शक्य असल्यास, अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा.
अस्सल बनारसी साड्यांवर सामान्यतः जाळीदार नक्षी आणि 'कटवर्क' चे डिझाईन असते. ही डिझाईन्स खूप बारीक आणि गुंतागुंतीची असतात.