साधे-सोपे उपाय करुन पालींना 'असं' पळवा, घरातून होतील गायब
पालीची खूप जणांना भीती वाटते. भिंतीवर दिसली तरी त्यांना घाम फुटतो.
कांद्याच्या वासाने देखील पाली जातात. कांदा पाण्यात टाकून त्याचा स्प्रे मारा.
घरामध्ये पाली झाल्या असतील तर काळीमिरीचं पाणी शिंपडा.
अर्धा चमचा हिंग पाण्यात टाकून त्याचा स्प्रे मारा, पाली आपोआप घराबाहेर जातील.
लिंबू आणि पुदीन्याचा रस करून तो घरभर शिंपडा.
लसूण सालीसह ठेचून पाण्यात टाका आणि त्याचा स्प्रे पाल असलेल्या ठिकाणी मारा.
पालीला पळवून लावण्यासाठी तंबाखू आणि कॉफी अत्यंत प्रभावी मानली जाते.