सुकलेली तुळस पुन्हा हिरवीगार करण्यासाठी टिप्स 

तुळशीचे रोप सुकू नये म्हणून कशी काळजी घ्यावी...

ऋतूमानानुसार तुळशीचे रोप अनेकदा कोमजते. पाने गळून पडतात, पण योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास पुन्हा रोप हिरवेगार होण्यास मदत होईल. 

सुकलेल्या फांद्या कापा. यामुळे रोपाची वाढ होईल. 

कुंडीतील माती थोडीशी बाहेर काढा, ज्यामुळे हवा आत जाईल. मुळांना ऑक्सिजन मिळेल आणि झाड लवकर बहरण्यास मदत होईल. 

मातीत थोडी हळद किंवा लाकडाची राख घाला. यामुळे रोपाला बुरशी लागणार नाही. 

मातीत शेण घातल्यास रोपाला चांगले खत मिळेल. 

माती आधीच ओली असेल तर रोपाला पाणी घालू नका. जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात. 

रोपाला सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवा. 

Click Here