खरं केसर ओळखण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा.
पदार्थाची चव वाढवण्यासाठी केशरचा वापर केला जातो. पण असली केशर ओळखण्यासाठी या गोष्टी कायम लक्षात ठेवा.
खऱ्या केशरचा रंग लाल किंवा नारंगी असतो. तर बनावट केशरचा रंग कधीकधी चमकदार किंवा फिकट असतो.
बेकिंग सोड्यामध्ये पाणी घालून त्यात केशर घाला. अस्सल केसरचा रंग हळूहळू हलका पिवळा किंवा केशरी होईल. तर बनावट केशर लगेच रंग सोडून धागा विरघळेल.
खऱ्या केशरचे धागे गरम पाण्यात किंवा दुधामध्ये लगेच विरघळतात. इतकेच नाही ते हळू हळू आपला रंग सोडतात.
अस्सल केशराचा सुगंध हा सौम्य असतो तर बनावट केशराचा सुगंध हा खूप तीव्र असतो. ज्यामुळे ओळखळे सोपे जाते.