खोबरेल तेलातील भेसळ ओळखण्याच्या ६ टिप्स... 

केसांसाठी असो किंवा त्वचेसाठी, किंवा मग स्वयंपाकासाठी शुद्ध खोबरेल तेल वापरणे खूप फायदेशीर ठरते. 

खोबरेल तेल हे भारतीय स्वयंपाकघरात आणि वेगवेगळ्या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 

खोबरेल तेल बनावट आहे की शुद्ध हे ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स आणि ट्रिक्स पाहूयात. 

खोबरेल तेल फ्रिजमध्ये ठेवून गोठवा, भेसळ असेल तर तेल तेल पूर्णपणे गोठणार नाही. याउलट शुद्ध तेल लगेच गोठून पूर्णपणे घट्ट होऊन पांढऱ्या रंगाचे दिसते. 

थोडं खोबरेल तेल बोटावर घेऊन चाखून पहा, त्याची चव नैसर्गिक, गोडसर असेल तर ते शुद्ध आहे असे समजावे. 

थोडं तेल कापसावर घेऊन पेटवा. शुद्ध खोबरेल तेलाने स्वच्छ धूर येतो याउलट जर धूर वा काळे डाग पडले, तर भेसळ आहे.

पाण्यात तेलाचा एक थेंब टाका. शुद्ध तेल तळाशी बसतं, भेसळयुक्त तेल पाण्यावर तरंगतं.

शुद्ध खोबरेल तेलाला हलका नारळाचा सुगंध येतो, तर बनावट तेलाला कृत्रिम सुगंध असतो.

तेल विकत घेताना बाटलीवरील लेबल काळजीपूर्वक वाचा. '१००% शुद्ध खोबरेल तेल, व्हर्जिन, कोल्ड-प्रेस्ड असे शब्द तपासा. इतर कोणत्याही तेलाचा उल्लेख नसावा.

Click Here