अनेकदा तुळशीच्या रोपाला कीड - बुरशी लागते. ज्यामुळे ती मरते, पाने कोवळी पडतात. अशावेळी काय करावं?
तुळशीची माती काही दिवस कोरडी ठेवा, ज्यामुळे कीटक मरतील.
पानांवर दररोज कडुलिंबाचे पाणी किंवा तेल फवारा.
कमी केमिकल्स असणारे साबणयुक्त पाण्याची फवारणी करा, यामुळे कीटक मरतील.
लसणाच्या पाकळ्या तुळशीजवळ ठेवा, यामुळे कीटक दूर राहतात.
मातीत थोडी राख किंवा दालचिनी पावडर घाला. हे नैसर्गिक कीटकनाशक आहे.
रोपाला दररोज सूर्यप्रकाशात ठेवा. ज्यामुळे आर्द्रता कमी होईल आणि कीटक वाढणार नाहीत.
पाने खूप खराब झाले असतील तर ती तोडून घ्या. ज्यामुळे नवीन पालवी फुटेल.