साबण, फेसवॉश सोडा- उन्हाळ्यात 'या' पद्धतीने चेहरा धुवा...

उन्हाळ्यात त्वचेवर छान ग्लो हवा असेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने चेहरा धुवा...

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन खूप वाढतं. 

काही जणींना तर पिंपल्स, रॅशेस असा त्रासही होतो. 

हे सगळे त्रास कमी करून त्वचेवर छान ग्लो हवा असेल तर साबण, फेसवॉश याऐवजी पुढे सांगितलेल्या पद्धतीने चेहरा धुवून पाहा...

यासाठी बेसन, मध, हळद आणि गुलाबजल एकत्र करा. यात थोडं कच्चं दूधही घालू शकता.

हा लेप चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.त्वचेवर छान चमक येईल. आठवड्यातून एकदाच हा उपाय करावा. 

Click Here