वेटलॉस करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा आहारात वेगवेगळ्या ८ पद्धतीने समावेश करा...
मेथी दाण्यांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि मेटाबॉलिझम वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात, जे वेटलॉस करण्यास मदत करतात.
विशेष म्हणजे, जर मेथीचे दाणे रोजच्या आहारात वेगवेगळ्या ८ पद्धतींनी समाविष्ट केले, तर वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
रात्रभर एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी कोमट करून प्या. हा सर्वात लोकप्रिय आणि सोपा उपाय आहे.
रात्री १ चमचा मेथी भिजत ठेवा आणि सकाळी उपाशीपोटी मेथी दाणे चावून खा, मेटाबॉलिझम वेगाने वाढून वेटलॉस भरभर होतो.
मेथी दाणे हलके भाजून त्याची पूड कोमट पाण्यासोबत सकाळी उपाशी पोटी घ्या, यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.
पाण्यात मेथी दाणे, थोडे आल आणि दालचिनी टाकून उकळा. हा चहा प्यायल्याने पोटाची ढेरी आणि कंबरेचा घेर कमी होतो.
रोजच्या जेवणातील सॅलॅडमध्ये मोड आलेली मेथी किंवा मेथी पावडर शिंपडा, यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.
जेवणात दह्यासोबत मेथी दाण्यांची पूड मिसळून खा, डाळ व सूपमध्ये देखील भुरभुरवून घालू शकता. पोट साफ ठेवण्यास मदत होते.
भाजलेल्या मेथी दाण्याची पूड व हळद पावडर मिसळा, सकाळी अर्धा चमचा हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या.
मेथी दाण्यांची पावडर मधात मिसळून घेतल्याने भूक कमी लागते आणि गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात राहते.