फक्त ५ मिनिटांत काढा पांढऱ्याशुभ्र जीन्सवरील हट्टी डाग... 

पांढरीशुभ्र जीन्स घातली की लूक फ्रेश आणि स्टायलिश दिसतो, पण थोडासा डाग पडला तरी जीन्स खराब झाल्यासारखी वाटते.

कोणत्याही प्रकारचे डाग पांढऱ्या जीन्सवर लगेच उठून दिसतात, परंतु घरातल्या साध्या पदार्थांनी हे हट्टी डाग सहज काढता येतात...

 पांढऱ्या शुभ्र जीन्सवरील डागांवर लिंबाचा रस थेट लावा, ५ ते १० मिनिटे उन्हात ठेवा आणि नंतर धुवा.

 अर्धी बादली पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळून जीन्स त्यात भिजवून ठेवा, डाग अगदी सहजपणे निघतात. 

जिद्दी डागांसाठी बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट तयार करा. डागावर लावा, ३० मिनिटे राहू द्या आणि नंतर धुवा.

पांढरी टूथपेस्ट डागावर लावा आणि सुकल्यावर हलक्या हाताने घासा यामुळे पांढऱ्या शुभ्र जीन्सवरील डाग लगेच निघतात. 

घाम किंवा अन्नाचे डाग असतील तर मीठ आणि पाण्याचे द्रावण तयार करा. डागावर लावून २० मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. 

डाग काढल्यानंतर जीन्स कडक उन्हात वाळवा. सूर्याचा प्रकाश नैसर्गिकरित्या पांढरा रंग अधिक उजळण्यास मदत करतो.

पांढऱ्या जीन्सवरील डाग काढताना नेहमी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा. जास्त गरम पाण्याने डाग अधिक पक्के होऊ शकतात.

Click Here

Your Page!