आळस झटकून फ्रेश राहण्यासाठी करा 'हे' बदल
दुपारी जेवल्यानंतर अनेकदा झोप, सुस्ती येते, ज्याला पोस्ट लंच डिप असं म्हटलं जातं.
जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते, शरीरात 'सेरोटोनिन' नावाचं हार्मोन तयार होतं, ज्याने झोप येते.
दुपारच्या वेळी खूप जास्त किंवा जड जेवण करणं टाळा. यामुळे आळस येतो.
तुमच्या आहारात प्रोटीनचा समावेश करा, शरीराला ऊर्जा मिळते आणि झोप येत नाही.
दुपारच्या झोपेवर मात करण्यासाठी वारंवार चहा किंवा कॉफी पिणे टाळा.