दिवसभरात किती पाणी प्यावं?

किडनी हेल्दी ठेवण्यासाठी दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण!

किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा फिल्टर आहे.

पाणी कमी प्यायल्यास किडनीच्या कार्यावर थेट परिणाम होतो.

शरीरातील विषारी पदार्थ आणि कचरा बाहेर टाकण्याचे काम किडनी करते. किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि ती निरोगी ठेवण्यासाठी पाणी सर्वात आवश्यक असते. 

किडनी निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे, पण हे प्रमाण प्रत्येकाच्या गरजेनुसार बदलते.

सकाळी उठल्यावर १ ग्लास कोमट पाणी प्या तसेच प्रत्येक जेवणाच्या ३० मिनिटं आधी १ ग्लास पाणी प्या. 

व्यायामानंतर किंवा उन्हात काम केल्यावर थोडे जास्तीचे पाणी प्यावे. 

दररोज किमान २.५ ते ३ लिटर म्हणजेच ८ ते १० ग्लास पाणी पिणे हे किडनीचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे.

Click Here