'केस गळणे' ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जेव्हा हे प्रमाण वाढते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात धाकधूक सुरू होते.
एका दिवसात किती केस गळणे सामान्य आहे? असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो.
आपल्या केसांचे सौंदर्य व आरोग्य टिकवण्यासाठी केस गळतीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
स्काल्पवर असलेले केस एका ठराविक जीवनचक्रातून जातात. जुने केस गळतात आणि त्यांच्या जागी नवीन केस येतात.
एका निरोगी व्यक्तीचे एका दिवसात ५० ते १०० केस गळणे हे पूर्णपणे सामान्य आणि नैसर्गिक मानले जाते.
कंगवा फिरवल्यावर, अंघोळ करताना किंवा उशीवर मोठ्या प्रमाणात केस दिसत असतील तर वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
केस गळती होण्यामागे स्ट्रेस, झोपेचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, हार्मोनल बदल, प्रदूषण, किंवा चुकीचा शाम्पू वापर ही काही प्रमुख कारणं आहेत.