केसांच्या वाढीसाठी दिवसाला किती कडीपत्त्याची पाने खावीत?

केसांच्या अनेक समस्या कमी करुन केसांची वाढ होण्यासाठी कडीपत्त्याची पाने खाणे फायदेशीर...

कडीपत्ता फक्त पदार्थांची चव वाढवणारी पानं नाहीत, तर केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक व गुणकारी औषध आहे.

दररोज कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने केसांना आतून पोषण मिळते आणि केसांची मुळं मजबूत होतात.

कडीपत्त्याच्या पानांमध्ये अमिनो अ‍ॅसिड, अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक केसांच्या फॉलिकल्सना अ‍ॅक्टिव्ह करून, केस तुटणे थांबवतात आणि नवीन केसांच्या वाढीस चालना देतात.

कडीपत्त्यामधील 'मेलेनिन' नावाचे रंगद्रव्य केस पांढरे होण्याची समस्या कमी करते आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकून ठेवण्यास मदत करते. 

कडीपत्ता रक्त शुद्ध करण्यास मदत करतो आणि स्काल्पपर्यंत योग्य पोषण पोहोचवतो ज्यामुळे नवीन केस वाढीस प्रोत्साहन मिळते.

रोज सकाळी ५ ते ७ ताजी कडीपत्त्याची पाने चावून खावीत किंवा रात्रभर पाण्यात पाने भिजवून ते पाणी सकाळी हलकेच उकळवून प्यावे. 

रोज ५ ते ७ कडीपत्त्याची पाने खाल्ल्याने केसांना आतून पोषण मिळते, केसगळती कमी होते आणि केस सुंदर व घनदाट होतात.

Click Here