पुरी तळलेली असल्यामुळे ती चविष्ट नक्की असते, पण त्याचबरोबर तेलामुळे कॅलरीजचं प्रमाणही जास्त असतं.
आरोग्य आणि वजन जपणाऱ्या प्रत्येकाला एक प्रश्न नक्कीच पडतो, एका पुरीत नेमक्या किती कॅलरीज असतात?
एका २५ ते ३० ग्रॅमच्या पुरीमधे सुमारे ७० ते १०० इतक्या कॅलरीज असतात.
पुरी जर कमी तेलात किंवा एअर फ्रायरमध्ये तयार केलेली असेल तर एका पुरीत ६० ते ७० इतक्या कॅलरीज असतात.
पुरी गव्हाच्या पिठाची असेल तर त्यात फायबरचे प्रमाण अधिक असेल, याउलट पुरी जर मैद्याची असेल तर त्यात अधिक जास्त कॅलरीज असतात.
वेटलॉस आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका वेळी २ पेक्षा जास्त पुऱ्या खाणे टाळा.
पुरी खाताना त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि त्यासोबत भरपूर सॅलड किंवा फायबरयुक्त भाज्या खा, जेणेकरून तुमचे जेवण संतुलित राहील.