मोठं कलिंगड एकदाच संपत नाही, त्यामुळे उरलेलं कलिंगड नेमकं किती दिवस सुरक्षितपणे खाऊ शकतो.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कलिंगड केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढते.
एकदा कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये योग्य रितीने साठवल्यास ३ ते ५ दिवसांपर्यंत चांगले राहू शकते. मात्र, ते जितके लवकर संपवाल तितके आरोग्यासाठी चांगले.
जर तुम्ही कलिंगड कापून बाहेर रुम टेम्परेचरला ठेवले असेल, तर ते २ तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवू नका. उष्णतेमुळे त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात.
जर कलिंगडाचा रंग फिका पडला असेल, त्याला आंबट वास येत असेल किंवा त्याचा पृष्ठभाग चिकट झाला असेल, तर असे कलिंगड त्वरित फेकून द्या.
फ्रिजमध्ये कापलेले कलिंगड उघड्यावर ठेवल्यास फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास त्याला लागू शकतो आणि ते लवकर खराब होऊ शकते.
जास्त दिवस ठेवलेलं कलिंगड खाल्ल्यास पोटाचे त्रास होऊ शकतात.