पार्टनरच्या घोरण्यामुळे झोप उडालीय?
काही लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते. मात्र घोरण्यामुळे आपल्या पार्टनरला किंवा इतर लोकांना त्रास होतो.
झोपताना एका कुशीवर झोपा, ज्यामुळे चांगली झोपही लागेल आणि घोरणं देखील टाळता येईल.
जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये घोरण्याची समस्या दिसून येते. वजन कमी केल्याने घोरणं कमी होऊ शकतं.
झोपण्याआधी दारू किंवा कॅफिनयुक्त गोष्टींपासून लांब राहा. यामुळे घोरणं कमी होईल.
नाक चोंदल्यामुळे कधी कधी घोरणं वाढू शकतं. यासाठी तुम्ही गरम पाण्याने वाफ घ्या.
हळद घातलेले दूध प्यायल्याने घशातील जळजळ कमी होऊन घोरण्याचा फारसा त्रास होणार नाही.
पुरेशी झोप न मिळाल्यास घोरणं वाढू शकत. घोरण्याची समस्या त्रासदायक असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.