ओले वर्तमानपत्र गुंडाळून बूटात भरा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते थोडे लूज आणि पायाच्या आकारानुसार व्यवस्थित सेट होतील.
प्लास्टिकच्या बॅगमध्ये पाणी भरा, ती बॅग बूटात ठेवा आणि बूट फ्रीझरमध्ये ठेवा. पाणी गोठल्याने बूट थोडे लूज होतात.
रात्री झोपण्यापूर्वी एका बटाट्याची साल काढून, तो बूटामध्ये घट्ट भागात ठेवून द्या. बटाटा रात्रभर ओलावा शोषून घेतो आणि बूट मोकळे करतो. लिंबू देखील वापरू शकता.