५ उपाय- काळपट पडलेले ओठ होतील लालचुटूक...

ओठ काळवंडलेले असतील तर हे काही घरगुती उपाय नक्कीच करून पाहा...

काळवंडलेल्या ओठांना पुन्हा छान गुलाबी, लाल रंग येण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच उपयोगी ठरतात.

पहिला उपाय म्हणजे ओठांना बीटरुटच्या रसामध्ये थोडी पिठीसाखर घालून ओठांना आठवड्यातून दोनदा स्क्रब करा.

साजूक तूप आणि हळद असा लेप ओठांना लावल्यास त्यांचा काळेपणा कमी होतो.

गुलाबपाणी आणि ग्लिसरीन एकत्र करून ओठांना मसाज करा. ओठ छान गुलाबी होतील.

मध आणि पिठीसाखर एकत्र करून ओठांवर चोळा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

लिंबू आणि कॉफी पावडर एकत्र करून ओठांना स्क्रबिंग केल्यास ओठांना छान नैसर्गिक लाल- गुलाबी रंग येतो.

Click Here