मुलांची उंची वाढत नाही याचे पालक टेंन्शन घेतात. यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय केले तर उंची नैसर्गिकरीत्या वाढू शकते.
मुलांची उंची हा अनेक पालकांसाठी चिंतेचा विषय असतो.
मुलांची उंची वाढत नाही याचे पालक टेंन्शन घेतात. यासाठी बाजारात मिळणारी औषधं वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक घरगुती उपाय केले तर उंची नैसर्गिकरीत्या वाढू शकते.
झोपेमध्ये शारीरिक वाढीसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे मुलांनी रोज किमान ८ ते १० तास झोप घ्यावी.
मुलांनी स्ट्रेचिंग आणि योगासनं करावीत. ताडासन, भुजंगासन आणि सूर्यनमस्कार ही आसने पाठीचा कणा लवचिक ठेवतात आणि शरीराची उंची वाढवण्यासाठी मदत करतात.
चांगल्या उंचीसाठी मुलांना नेहमी संतुलित आहार द्यावा. डाळी, हरभरे, सोयाबीन आणि मूग हे प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहेत. हे पदार्थ रोजच्या जेवणात समाविष्ट केल्यास उंची वेगाने वाढते.
दुध, ताक आणि दह्यात भरपूर कॅल्शियम असते, जे हाडं मजबूत करते. रोज एक-दोन ग्लास दूध आणि सुका मेवा दिल्यास मुलांची उंची वाढते.
सकाळच्या सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन 'डी' हाडांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. रोज सकाळी ३० मिनिटे सूर्यप्रकाशात खेळल्याने शरीर मजबूत होतं आणि उंची वाढते.
दिवसभरात पुरेसे पाणी पिण्यासाठी द्यावे. मुलांना कायम हायड्रेटेड ठेवावे.
जंक फूड, कोल्ड ड्रिंक आणि जास्त साखर असलेले पदार्थ शरीराची नैसर्गिक वाढ रोखतात. त्याऐवजी मुलांना फळं आणि भाज्या खायला द्या.